Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न सामोपचाराने सोडवा; अण्णा बनसोडे यांचे निर्देश

चिकणघर येथील बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्राच्या विकासाला गती देण्याचे प्रयत्न; जमीन कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

मुंबई : कल्याण तालुक्यातील मौजे चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न सामोपचाराने सोडवून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. तसेच, बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न आणि बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्राच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जमिनीशी संबंधित बाबी आणि विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.

जमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत प्रस्ताव सादर करा

बुद्धभूमी फाउंडेशनची संबंधित जमीन कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने देण्याबाबत आवश्यक प्रस्ताव सादर करावा, तसेच त्यासंदर्भातील नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रक्रियेमुळे जमिनीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार असून, पर्यटन केंद्राच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर पुढील कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

हेही वाचा –  एसटी बसस्थानकांवरील अस्वच्छता खपवून घेणार नाही! हलगर्जीपणा केल्यास विभाग नियंत्रकांवर कारवाई

नुकसानभरपाई कंत्राटदाराकडून वसूल करण्याचे निर्देश

विकासकामांदरम्यान बुद्धभूमी फाउंडेशनचे काही नुकसान झाले असल्यास त्याची योग्य तपासणी करून संबंधित कंत्राटदाराकडून नुकसानभरपाई वसूल करावी, असे निर्देशही विधानसभा उपाध्यक्षांनी दिले. फाउंडेशनच्या हिताचे संरक्षण करत संबंधित प्रश्न सामोपचाराने सोडविण्यावर त्यांनी भर दिला.

या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) संबंधित अधिकारी आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून जमिनीचा प्रश्न आणि पर्यटन केंद्राच्या विकासाशी निगडित बाबी मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button