Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘दिमागी नक्षलवाद्यांनी काँग्रेसवर ताबा मिळवला’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत पक्षाला ‘परजीवी’ असे संबोधले आहे. “दिमागी नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीवर असा कब्जा केला आहे की पक्षाने स्वतःची विचार करण्याची क्षमताच गमावली आहे,” असा आरोप मोदी यांनी केला. नवी दिल्ली येथे आयोजित ‘एनडीटीव्ही वर्ल्ड समिट’मध्ये ते बोलत होते.

लोकशाहीतील आंदोलनांचे महत्त्व विशद करताना पंतप्रधान म्हणाले, “सरकारच्या कमतरता स्वाभाविकपणे समोर आणणारी आणि व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी आंदोलने सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक असतात. मात्र, काँग्रेस अशा आंदोलनांनाही उद्ध्वस्त करते. काँग्रेस आता अशा परजीवी पक्षात रूपांतरित झाली आहे, जो इतर कोणालाही पुढे जाऊ देत नाही.”

हेही वाचा

स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी आपल्या वस्तू कचऱ्यात न टाकता आर.आर.आर. केंद्रात द्या

काँग्रेसच्या विचारक्षमतेवर ‘दिमागी नक्षलवाद्यांनी’ कब्जा केल्याचा आरोप करत मोदी म्हणाले की, जंगलांमध्ये विनाश घडवणारे लोक आता काँग्रेसमध्ये शिरून देशाचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात आहेत. “जंगलांमध्ये विनाश घडवणारे लोक आता काँग्रेसमध्ये शिरले आहेत आणि देशाचा सर्वनाश करण्याच्या प्रयत्नात आहेत,” असे मोदी यांनी म्हटले. देशासमोर अनेक आव्हाने असली, तरी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे मोठे उद्दिष्ट समोर असल्याचे मोदी यांनी सांगितले. या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी देशाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘एसआयआर’वरून काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेविरोधात काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मोहिमेमुळे पात्र मतदारांची नावे कट केली जात असल्याचा आरोप करत, ‘हर गली जंतरमंतर’ या घोषणेखाली २३ ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाद्वारे ही प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button