हिंजवडीत गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या; पती पोलिसांच्या ताब्यात

हिंजवडी | पुणे जिल्ह्यातील हिंजवडी परिसरात गर्भवती महिलेची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिता कुमारी गोंड (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती राकेश सागर गोंड (वय ३०) याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्प, कस्तुरी चौक, हिंजवडी येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हेही वाचा
तिबेटमध्ये ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; जमिनीखाली १० किमी खोलीवर केंद्रबिंदू
अनिता कुमारी गोंड ही गर्भपात होऊ नये म्हणून कापूरमध्ये लवंग टाकून त्याची वाफ घेत होती. त्यावेळी ती अर्धनग्न अवस्थेत खोलीबाहेर येऊन आरडाओरड करू लागली. याच कारणावरून तिचा पती राकेश गोंड याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३९/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक किशन कांदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि पुढील तपासातून समोर येणारे तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होतील.




