ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी; कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे

पीसीयू मध्ये राष्ट्रीय आयइइइ परिसंवादातून एआय उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना

पिंपरी, पुणे | पिंपरी चिंचवड विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक प्रगती आणि उद्योग क्षेत्राशी अर्थपूर्ण समन्वय ठेवण्याची बांधिलकी असल्याचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे एआय उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय आयइइइ परिसंवादात उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. सोनवणे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एमआयटी विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ, टी. बी. सानस महाविद्यालय, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर, एआयएसएसएमएस, सिंहगड इन्स्टिट्यूट आणि संदिप विद्यापीठ यांसह विविध शैक्षणिक संस्थांतील ११० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

हेही वाचा

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवाना

“एआय चलित अभियांत्रिकी शिक्षण” या चर्चेत उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उच्च तंत्रज्ञान देवाणघेवाण, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत, एआय आधारित उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि त्यांचे व्यावहारिक उपयोग यावर तज्ञांनी चर्चा केली. तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी, अधिष्ठाता डॉ. सचिन पवार, पीसीयू संचालक, संशोधन व विकास संचालक डॉ. भारत काळे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, इनक्युबेशन व नवोपक्रम, संचालक डॉ. प्रणव चरखा, आंतरराष्ट्रीय संबंध केंद्र संचालक डॉ. विजय पाटील, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी डॉ. अमित गाडेकर यांचेही मार्गदर्शन लाभले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून या उपक्रमात विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी परिचित होण्याची तसेच त्याच्या व्यावहारिक उपयोगांचे आकलन करण्याची मौल्यवान संधी मिळाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button