जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ मुलांच्या संघाला सलग सातव्यांदा विजेतेपद

पिंपरी चिंचवड: मदनलाल धिंग्रा मैदान निगडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात सलग सातव्यांदा विजेतेपद संपादन करून रोमहर्षक विजय मिळविला. 19 वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकलेल्या सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेजच्या संघाने राजमाता जिजाऊ ज्युनिअर कॉलेजच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. राजमाता जिजाऊ संघाने 10 ओव्हर मध्ये 02 बाद 151 धावांचे आव्हान सिम्बायोसिस ज्युनिअर कॉलेजच्या संघाला देण्यात आले होते त्याला प्रत्युत्तर देताना सिम्बायोसिसज्युनियर कॉलेज संघ हे आव्हान पूर्ण करू शकला नाही त्यांनी 110ओव्हर मध्ये ओव्हर 65/5 धावा काढल्या त्यामुळे सलग सातव्यांदा विजयाची नोंद केली. या विजयात प्रतिक कडलग याने 41 संतोष चव्हाण 33 धावा, केंगार अभिनव याने 28 धावा तेजस गिलबिलेने 24 धावा करत संघाच्या धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी केली. तसेच रोनीत पोद्दार, विहान बागड, माने तन्मय, आर्यन चौव्हाण,अभिनव जमदाडेयांनीभेदकगोलंदाजीकरत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे राजमाता जिजाऊ ज्युनिअर कॉलेजच्या संघाची त्रिमूर्ती स्कूल नेवासा फाटा नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या,शालेय विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या विजयी संघात कु. आदित्य शेंडगे, ध्रुवील रायठ्ठा, शंतनू फाटे, सोहम मोहिते, तन्मय पाटील, साई गुंजाळ, अखिलेश पाटील, रोनीत पोद्दार, विहान बागड, माने तन्मय, आर्यन चौव्हाण, अभिनव जमदाडे, प्रतीक कडलक, तेजस गिलबिले, अभिनव केंगार, संतोष चव्हाण या सर्व खेळाडूंचा समावेश होता.

या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व प्रशिक्षक श्री.दत्तात्रेय वाळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चिं.मनपा स्थायी समिती मा.अध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीरभाऊ मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.




