Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएल २०२७ च्या लिलावाची तारीख ठरली! गोव्यात ‘या’ दिवशी लागणार खेळाडूंवर बोली

IPL 2027 Mini Auction | इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २०२७ मधील ऐतिहासिक २०व्या हंगामासाठी सर्वच फ्रँचायझींनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाचे ठिकाण आधीच निश्चित करण्यात आले होते; आता या मिनी ऑक्शनची संभाव्य तारीखही समोर आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, हा मिनी लिलाव येत्या १६ डिसेंबर २०२६ रोजी गोव्यात पार पडण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही हंगामांतील लिलाव परदेशात पार पडले होते. मात्र, यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हा लिलाव मायदेशातच घेण्याचा निर्णय घेतला असून यासाठी निसर्गरम्य गोव्याची निवड करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या लॉजिस्टिक्स पथकाने सर्व फ्रँचायझींना पाठवलेल्या एका व्हॉट्सॲप मेसेजमधून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा

ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराबाहेर भीषण अपघात! ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू तर ४० जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रँचायझी मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) अद्याप औपचारिक ई-मेलद्वारे तारीख कळवण्यात आलेली नाही. मात्र, बीसीसीआयच्या लॉजिस्टिक मेसेजमध्ये नमूद केल्यानुसार, हा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यातील ‘आयटीसी ग्रँड गोवा’ (ITC Grand Goa) या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी १५ डिसेंबर रोजी फ्रँचायझी प्रतिनिधींसोबत पूर्वतयारीची माहितीपर बैठक (Pre-auction briefing) घेतली जाईल. अनेक फ्रँचायझींनी हा मेसेज मिळाल्याची पुष्टी केली आहे.

लवकरच अधिकृत घोषणा

प्रवास, निवास आणि अंतर्गत व्यवस्थेच्या पूर्वतयारीसाठी हा मेसेज पाठवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे बीसीसीआय लवकरच या तारखेवर अंतिम शिक्कामोर्तब करून फ्रँचायझींना अधिकृत पत्र पाठवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, याच काळात भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार असून, १६ डिसेंबर रोजीच बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील दुसरा वनडे सामनाही खेळवला जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button