Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराबाहेर भीषण अपघात! ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू तर ४० जखमी

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आज पहाटेच्या सुमारास शीतला माता मंदिराजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. धान (भात) वाहून नेणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरून चालणाऱ्या भाविकांना चिरडल्याने तब्बल १३ भाविकांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ग्वाल्हेरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक छिनोरच्या दिशेने येत होता. छिनोरकडून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अत्यंत तीव्र उतार असून तेथे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पहाटे दीडच्या सुमारास धान भरलेला हा ट्रक पोलिसांनी रोखला होता. मात्र, उतारावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रकने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून थेट मंदिराच्या बाहेरील भिंतीला व गेटला जोरदार धडक दिली. यावेळी दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर हा ट्रक गेल्याने मोठा अनर्थ घडला.

हेही वाचा

नोकरीला लागलेल्या तरुणांना सरकारकडून ₹१५,००० पर्यंतची मदत! EPFO अंतर्गत ‘या’ योजनेचा लाभ कसा मिळणार?


एसएसपी धर्मवीर सिंह म्हणाले की, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मोठ्या संख्येने भाविक शीतला माता मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला. बंदोबस्तावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही या धडकेत जखमी झाले आहेत. अपघातानंतर एकूण ३९ हून अधिक लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.”

रुग्णालयात उपचार सुरू; काहींची प्रकृती चिंताजनक

अपघातातील ५ ते ६ जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना गंभीर फ्रॅक्चर झाले आहेत. इतर जखमींना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून मदतकार्य वेगाने राबवले जात असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button