ताज्या घडामोडीपुणे

शर्मिला डोंगरे यांची पब्लिक राइट्स फाउंडेशनच्या पुणे महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे | पब्लिक राइट्स फाउंडेशनच्या पुणे महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शर्मिला बाळासाहेब डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सामाजिक न्याय, समानता, जनसेवा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि जनजागृती या क्षेत्रांत डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावीपणे कार्य करता येईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा

रात्री एकत्र जेवण, सकाळी मृतावस्थेत! ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू

पब्लिक राइट्स फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत शिक्षण, समानता, सन्मान आणि सक्षमीकरणाचा संदेश पोहोचविण्याचे काम केले जाते. या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शर्मिला डोंगरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.

या नियुक्तीमुळे डोंगरे यांच्यावर पुणे महिला विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, महिला सक्षमीकरणासह विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button