Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांना जामीन मंजूर; वर्षभर शांतता राखण्याची अट?

नवी दिल्ली | कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची लवकरच सुटका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. आज त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिपके यांना काही अटी घातल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना सुमारे वर्षभर शांतता राखण्याच्या बंधपत्रावर (Bond) स्वाक्षरी करावी लागणार आहे. या शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांची तात्काळ सुटका केली जाईल आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जाणार नाही.

हेही वाचा

शर्मिला डोंगरे यांची पब्लिक राइट्स फाउंडेशनच्या पुणे महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

प्रतिबंधात्मक कलमांखाली कारवाई

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शांतताभंग रोखण्यासाठी आणि दखलपात्र गुन्ह्यांविरुद्ध खबरदारीचा उपाय म्हणून ही प्रतिबंधात्मक कलमे लावली जातात. आज त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते, जिथे सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button