TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवाजी पार्क येथील दुर्गापूजा उत्सवात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे दर्शन; बंगाल क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन

‘समाजाची खरी ताकद संस्कृती आणि एकजुटीत’; सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उत्सवाचे राज्यपालांकडून कौतुक

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शिवाजी पार्क येथे आयोजित बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट देऊन देवी दुर्गेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते बंगाल क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बंगाल क्लबच्या वतीने आयोजित दुर्गापूजा हा सर्वांना एकत्र आणणारा तसेच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा –  मुंबई महापालिकेच्या शाळांत ‘स्मार्ट नागरिक’ उपक्रम सुरू; संविधानिक मूल्यांचे धडे घेणार विद्यार्थी!

“समाजाची खरी ताकद आर्थिक संपत्तीपेक्षा संस्कृती आणि एकजुटीत आहे,” असे प्रतिपादन राज्यपालांनी केले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करावे आणि परस्परांमधील एकोपा कायम राखावा, यासाठी सर्वांनी मिळून देवी दुर्गेकडे प्रार्थना करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासोबतच समाजातील विविध घटकांना एकत्र येण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा उत्सवांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते.

यावेळी बंगाल क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button