TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मालेगावातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया वेगवान करा : मंत्री दादाजी भुसे

२,७९८ अतिक्रमणधारकांची प्रकरणे यापूर्वीच नियमानुकूल; आदेश पारित झालेल्या ७५५ जणांना उतारे देण्याचे निर्देश

मालेगाव : शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे शासनाच्या निकषांनुसार नियमानुकूल करण्याची प्रक्रिया गतिमान करावी. प्रलंबित प्रस्तावांची छाननी, जमिनींची मोजणी, मालकी हक्कांची पडताळणी आणि नियमानुकूलतेचे आदेश पारित झालेल्या प्रकरणांतील उतारे वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, महानगरपालिका उपायुक्त डॉ. सुनीता कुमावत, तहसीलदार विशाल सोनवणे, नगर भूमापन अधिकारी पंढरीनाथ चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी शेखर तनपुरे आणि उपअभियंता सचिन माळवाळ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

२,७९८ अतिक्रमणधारकांची प्रकरणे नियमानुकूल

मंत्री भुसे म्हणाले की, उपलब्ध अहवालानुसार यापूर्वी २ हजार ७९८ अतिक्रमणधारकांची प्रकरणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. तसेच ५०० चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रावरील ५०६ अतिक्रमणधारकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.

महसूल व वन विभागाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार म्हाळदे गावठाण, सोयगाव आणि द्याने गावठाण येथील ५४२ अतिक्रमणधारकांचे प्रस्ताव नव्याने सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांमध्ये निवासी आणि व्यावसायिक अतिक्रमणधारकांच्या स्वतंत्र याद्या तयार करून जमिनींची मोजणी येत्या आठवडाभरात पूर्ण करावी, असे निर्देश भुसे यांनी दिले.

हेही वाचा –  राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात; ५२ साखर कारखान्यांना परवाने

७५५ अतिक्रमणधारकांना उतारे देण्याचे निर्देश

यापूर्वी नियमानुकूलतेचे आदेश पारित झालेल्या ७५५ अतिक्रमणधारकांना संबंधित उतारे वितरित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. यासाठी जमिनींचे अभिलेख, मालकी हक्कांची पडताळणी, आवश्यक ना-हरकत दाखले आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

महानगरपालिका, महसूल आणि भूमी अभिलेख विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

दरेगावमधील घरकुलांचा प्रश्न सोडवण्याचे निर्देश

दरेगाव येथील संभाव्य वनक्षेत्रातील घरकुलांशी संबंधित समस्या महसूल विभाग, वन विभाग आणि महानगरपालिका यांनी समन्वयातून सोडवाव्यात, असे निर्देश मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार हाताळताना प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे आणि संबंधित नागरिकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीला गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group