रस्त्यावर धावणार अन् हवेतही उडणार; टेस्ला ‘Roadster 2’ चे हवेत थरारक उड्डाण, व्हिडिओ व्हायरल

Tesla Flying Car | टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क यांनी ऑटोमोबाईल जगताला थक्क करणारे अद्भूत तंत्रज्ञान जगासमोर सादर केले आहे. टेक्सासमधील स्पेसएक्सच्या रॉकेट डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग फॅसिलिटीमध्ये झालेल्या एका खास प्रात्यक्षिकादरम्यान टेस्लाच्या बहुप्रतिक्षित ‘रोडस्टर २’ (Roadster 2) या सुपरकारने थेट हवेत झेप घेत सर्वांचे डोळे दीपवून टाकले. रस्त्यावर सुसाट धावण्यासोबतच हवेत तरंगण्याची क्षमता सिद्ध करत टेस्लाने मानवाचे ‘फ्लाइंग कार’चे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे.
प्रात्यक्षिकाच्या समोर आलेल्या थरारक व्हिडीओमध्ये ही इलेक्ट्रिक सुपरकार एका मोठ्या वक्र रॅम्पवरून (Curved Ramp) धावताना दिसते. रॅम्पवरून वेगाने पुढे जात असताना ही कार हवेत पूर्णपणे उलटी होते आणि पुढच्याच क्षणी हवेत तरंगू लागते. काही सेकंद हवेत उड्डाण केल्यानंतर कारने अत्यंत सुरक्षितपणे जमिनीवर यशस्वी लँडिंग केले.
या ऐतिहासिक लँडिंगनंतर एलन मस्क यांनी “हे यशस्वी झाले!” (Well, it worked) अशी प्रतिक्रिया दिली; तर टेस्लाच्या व्हेईकल इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष लर्स मोरावी यांनी “उडणाऱ्या कार आता खरोखर अस्तित्वात आल्या आहेत,” अशी घोषणा केली. या प्रात्यक्षिकादरम्यान रोडस्टरने टेस्लाच्या संपूर्ण कार ताफ्यावरून आणि सायबरट्रकच्या थेट वरून हवेत झेप घेत लँडिंग केले. ही कार अवघ्या एका सेकंदात ० ते ६० mph चा प्रचंड वेग पकडण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Real life, baby https://t.co/3QEqn18wig
— Tesla (@Tesla) October 16, 2026
हेही वाचा
भारत विरुद्ध झिम्बाब्वे आमनेसामने! पहिला टी-२० सामना कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?
रोडस्टर २ हवेत कशी उडते?
कार हवेत कशी उडते यावर प्रकाश टाकताना लर्स मोरावी यांनी स्पष्ट केले की, यामागील तंत्रज्ञान ‘स्पेसएक्स’च्या कोल्ड गॅस थ्रस्टर्सवर आधारित आहे. ‘टेक्क्रंच’च्या रिपोर्टनुसार, या कारला हवेत उचलण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी ६० लीटर कंप्रेस्ड एअरने जोडलेल्या तब्बल १० थ्रस्टर्सचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये जेवढी जास्त कंप्रेस्ड हवा साठवली जाईल, तेवढा जास्त वेळ ती हवेत उडू शकेल, असे टेस्लाने स्पष्ट केले आहे.
खरेदीसाठी केव्हा उपलब्ध होणार?
२०१७ मध्ये पहिल्यांदा घोषित झालेली ही नेक्स्ट-जनरेशन रोडस्टर गेल्या जवळपास एका दशकापासून विकसित केली जात आहे. आजच्या यशस्वी चाचणीनंतरही ही कार लगेच ग्राहकांच्या हातात येणार नसून, तिचे प्रत्यक्ष उत्पादन २०२८ मध्ये सुरू होईल, असे मस्क यांनी जाहीर केले आहे.
किंमत किती असणार?
परफॉर्मन्स (Performance): हे ‘रोड रेडी’ मॉडेल असून याच्या रिझर्व्हेशन बुकिंगसाठी ५०,००० डॉलर्स (सुमारे ४२ लाख रुपये) मोजावे लागतील.
थ्रस्ट (Thrust): हे ‘रेस रेडी’ मॉडेल असून बुकिंगसाठी २,५०,००० डॉलर्स खर्च करावे लागतील.
रॉकेट (Rocket): हे कारचे टॉप-टियर ‘एअर रेडी’ मॉडेल असून ते थेट सर्वांना खरेदी करता येणार नाही; हे मॉडेल केवळ निवडक निमंत्रितांसाठी (Invite-only) उपलब्ध असेल.




