Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत विरुद्ध झिम्बाब्वे आमनेसामने! पहिला टी-२० सामना कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?

IND-W vs ZIM-W | हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्टार फलंदाज स्मृती मानधना पहिल्यांदाच भारतीय संघाची पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून, दोन्ही संघांमध्ये पहिल्यांदाच अशी द्विपक्षीय टी-२० लढत रंगणार आहे.

या मालिकेतील तिन्ही टी-२० सामने रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील; ज्यामध्ये पहिला सामना १६ ऑक्टोबर, दुसरा सामना १८ ऑक्टोबर आणि तिसरा सामना २० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील, तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होईल. तसेच या मालिकेचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर, तर डिजिटल स्ट्रीमिंग जिओ सिनेमा व डिस्नी+ हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येईल.

हेही वाचा

नवरात्रोत्सवात १९ व २० ऑक्टोबरला रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना सशर्त मुभा; पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

भारतीय महिला संघ:

स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी कमलिनी, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणि, श्री चरणी, नंदिनी शर्मा, क्रांति गौड, अनुष्का शर्मा, जिन्तिमणि कलिता, निकी प्रसाद आणि प्रेमा रावत.

झिम्बाब्वे महिला संघ:

जोसेफिन नकोमो (कर्णधार), केलिस नधलोवु, बिलवेड बिजा, न्याशा ग्वानझुरा, मोडेस्टर मुपाचिक्वा, शार्ने मेयर्स, लोरिन फिरी, फ्रांसिस्का चिपारे, कुडजई चिगोरा, नोमवेलो सिबांडा, ओलिन्दर चारे, मिशेल मावुंगा, तेंडाई मकुशा, चिपो मुगेरी-तिरिपानो आणि चिएद्झा धुरुरू (यष्टिरक्षक).

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button