TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

कोल्हापूर खंडपीठाने अर्ज अवैध ठरवल्यानंतर पडळकरांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अर्ज वैध ठरल्याने समर्थकांकडून समाधान व्यक्त

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी दाखल केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. या निर्णयाविरोधात पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्जाच्या वैधतेवरून वाद

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जत सोसायटीमधून अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप माजी आमदार विक्रम सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी केला होता. पडळकर हे कोणत्याही संस्थेचे संचालक नसून, दोन वर्षांपूर्वीचे सभासदही नसल्याचा दावा विरोधकांनी केला होता.

या आक्षेपांनंतरही बँकेच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला होता. या निर्णयाला विक्रम सावंत आणि सुजय शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान दिले.

हेही वाचा –  शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भंडाऱ्यात धक्का! तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटात

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे कोल्हापूर खंडपीठाने पडळकर यांचा अर्ज अवैध ठरवला होता. या निर्णयानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर पडळकर यांचा अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढवता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

समर्थकांकडून समाधान

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले. त्यांचे कार्यकर्ते महादेव पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, विरोधकांनी उच्च न्यायालयात जाऊन पडळकर यांच्या अर्जाला आव्हान दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पडळकर यांच्या बाजूने लागल्याने ते निवडणूक लढवू शकतील, असे पाटील यांनी सांगितले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पडळकर यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेला कायदेशीर पेच या निर्णयामुळे दूर झाल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button