शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कु.तनिष्का शिंदे हिस रौप्य पदक

पिंपरी-चिंचवड : जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 58 किलोग्रॅम वजन गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे येथील कु. तनिष्का हरिचंद्र शिंदे इ.12 वी वाणिज्य या खेळाडूने मेहनत, शिस्त व खेलाडू वृत्तीचे दर्शन दाखवत 133 किलोग्रॅम वजन उचलून रौप्यपदक मिळविले. तसेच या खेळाडूने यापूर्वी देखील राज्य व राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग तसेच पावरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. या खेळाडूला कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व प्रशिक्षक विजय पाटील सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.




