ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग्रंथांचा आधार घेऊन कौशल्य सिद्ध करा, ग्रंथ विश्वासार्हता देतात – प्रा. डॉ. मीनल ओक

एसबीपीआयएम येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

पिंपरी, पुणे :  सध्याचा काळ हा कौशल्य प्राप्त असणाऱ्या व्यक्तींचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लेखन, वाचन, संवाद कौशल्य विकसित करून गुणवत्ता वाढवली पाहिजे. एमबीए आणि पीएचडी सारखे उच्च शिक्षण घेत असताना तुमची क्षमता सिद्ध करावी लागते. यासाठी पूर्णता एआय किंवा गुगल वर अवलंबून राहू नये, तर ग्रंथालयात जाऊन संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन आपले कौशल्य सिद्ध करा, ग्रंथ तुम्हाला विश्वासार्हता देतात त्यामुळे शब्दसंग्रह समृद्ध होतो. संवाद साधताना तांत्रिक भाषा किंवा पारिभाषिक शब्दांचा वापर करून आत्मविश्वासाने सादरीकरण करता येते. नेहमी स्वतः मूळ लेखन करावे. संदर्भांसाठी एआय आणि ॲप्स चा वापर सहाय्यक म्हणून करता येईल, परंतु त्यातील मजकूर कॉपी पेस्ट करू नये. कारण ते वाङ्मयचौर्य आहे असे मार्गदर्शन आयएमसीसी च्या प्रा. डॉ. मीनल ओक यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे वाचन प्रेरणा दिवस निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. ओक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी राष्ट्रपती ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात ग्रंथ वाचन करीत त्यांना अभिवादन केले. यावेळी एसबीपीआयएम च्या संचालक, प्राचार्य डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, आर अँड डी प्रमुख डॉ. भूषण परदेशी, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. स्वप्नील सोनकांबळे, डॉ. अमरीश पद्मा आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कु.तनिष्का शिंदे हिस रौप्य पदक

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना वाचक प्रेरणा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

ग्रंथपाल स्वाती सातपुते, सहाय्यक ग्रंथपाल अनघा कुलकर्णी यांनी आयोजनात सहभाग घेतला.
सूत्रसंचालन विद्यार्थी आर्या सरदेशपांडे, ओम माळी यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button