ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजमाता कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

डुडुळगाव: राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव येथील शैक्षणिक संकुलातील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि युवा पिढीचे प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल कुंभार उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार श्री. विलास लांडे, संस्थेचे सचिव मा. श्री. सुधीर मुंगसे, खजिनदार श्री. अजित गव्हाणे विश्वस्त मा. श्री. विक्रांतजी लांडे आणि विश्वस्त मा.श्री.सुमित मुंगसे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा –  ग्रंथांचा आधार घेऊन कौशल्य सिद्ध करा, ग्रंथ विश्वासार्हता देतात – प्रा. डॉ. मीनल ओक

यावेळी डॉ. जीवन धुमाळ, डॉ. निलेश जाधव, श्री. संजय तोगम, सौ. सपना शेंगाळ, प्रा. ऋतुजा तावरे, प्रा. अचल चिमकर, प्रा. मेघा जाधव, प्रा.कल्याणी थोरात, प्रा. प्रतिमा पोळके आणि प्रा. सविता दुबे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचन संस्कृती रुजविणे आणि ज्ञानसमृद्ध समाज घडविणे हा संदेश देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button