Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; पुढील पाच वर्षांसाठी निवड

पुणे | श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोमवारी (दि.१२ ऑक्टोबर) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही निवड पाच वर्षांसाठी आहे. तसेच माजी अध्यक्ष सुनील रासने यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, विद्यमान उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त राजेंद्र गावडे, पराग वांबूरे, रोहित लोंढे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

नवनियुक्त अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचे शिक्षण बी.ई. सिव्हिल झाले असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. सन १९८४ मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून ते या कार्यात सक्रीय झाले. तर, सन १९९६ साली सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली. सन २००१ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या विश्वस्त पदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर सन २०१० साली ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला.

हेही वाचा

गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्समध्ये संस्थापक दिन उत्साहात साजरा

त्यांचे वडील ऍड.शंकरराव सूर्यवंशी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष होते. वित्तीय कामकाजातील काटेकोरपणा, सुसूत्रता आणि उत्तम व्यवस्थापन ही महेश सूर्यवंशी यांची कार्यवैशिष्ट्ये असून ट्रस्टसाठी कोंढवा येथे बालसंगोपन केंद्र आणि वृद्धाश्रमाची सुंदर वास्तू सिव्हील इंजिनिअर म्हणून त्यांनी उभी केली. ‘सार्वजनिक विश्वस्त संस्था सत्ताकेंद्र न होता मानवसेवेचे सेवाकेंद्र झाले पाहिजे’, हा त्यांचा विचार आहे. त्यानुसार पुढील काळात कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

मागील बैठकीतील निर्णयानुसार १४ वर्षांचे नियोजित अध्यक्ष

सन २०२२-२४ यासाठी ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांनी कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर सन २०२४-२६ अशा दोन वर्षांसाठी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने हे कार्यरत होते. आता सन २०२६-३१ या पाच वर्षांसाठी महेश सूर्यवंशी हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. तर, सन २०३१ – ३६ या त्यापुढील पाच वर्षांसाठी हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button