Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पूंछमध्ये घुसखोरीचा डाव उधळला; भूसुरुंग स्फोटात लष्कर कमांडरसह ४ दहशतवादी ठार!

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून (LoC) भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट सुरक्षा दलांनी निष्फळ ठरवला आहे. कृष्णा घाटी सेक्टरमधील सतवाल नाकी परिसरात सोमवारी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या भीषण भूसुरुंग (Landmine) स्फोटात लष्कर-ए-तोयबाच्या एका वरिष्ठ कमांडरसह चार दहशतवादी जागीच ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात कमांडर मोहम्मद फैजान याचा समावेश आहे. याशिवाय मोहम्मद इश्तियाक, वकास आणि असीम अशी उर्वरित तीन मृतांची नावे असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी

सीमेपलीकडून भारतात घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराने सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून या संवेदनशील भागात भूसुरुंग पेरले आहेत. सोमवारी दहशतवाद्यांचा हा गट सतवाल-नाकी भागातून छुप्या मार्गाने भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन पुढे सरकत असतानाच ते थेट सुरुंगांनी भरलेल्या भागात पोहोचले आणि त्यांचा पाय सुरुंगावर पडताच प्रचंड मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात चारही दहशतवादी जागीच ठार झाले.

या घटनेनंतर नियंत्रण रेषेवर सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात लष्कराने कडक शोधमोहीम हाती घेतली आहे. संभाव्य धोके लक्षात घेऊन सीमेवरील टेहळणी आणि गस्त आणखी वाढवण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button