Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

जगाला टॅरिफचे इशारे देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी कोलांटउडी; रशियाकडून ४८ लाख टन डिझेल खरेदीचा करार

Trump-Putin Oil Deal | अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध व भरमसाठ टॅरिफ लादण्याची घोषणा करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशियाशीच मोठा इंधन करार केला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या करारानुसार अमेरिका आणि जागतिक बाजाराला रशियाकडून तब्बल ४८ लाख टनांपेक्षा अधिक डिझेलचा पुरवठा होणार आहे. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या कराराची अधिकृत माहिती दिली असून पुतिन यांचे जाहीर आभार मानले आहेत.

ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारांतर्गत रशिया तात्काळ ३ लाख टनांपेक्षा जास्त डिझेलचा पुरवठा सुरू करणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आणखी ५ लाख टन, पुढील टप्प्यात १० लाख टन आणि रशियातील रिफायनरीजच्या क्षमतेनुसार अतिरिक्त ३० लाख टन डिझेल उपलब्ध करून दिले जाईल. हा सर्व पुरवठा पूर्ण झाल्यास एकूण आयात ४८ लाख टनांच्या वर जाईल.

या घोषणेनंतर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या ‘ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल’ने (OFAC) तातडीने पावले उचलत रशियन डिझेलची विक्री, वाहतूक आणि आयातीशी संबंधित व्यवहारांना तात्पुरती मंजुरी देणारा ‘जनरल लायसन्स’ जारी केला आहे. या विशेष सवलतीची मुदत ७ एप्रिल २०२७ पर्यंत असणार आहे.

हेही वाचा

वयाच्या ४२ व्या वर्षी ‘मिस्टर ३६०’ चे वादळ! एबी डिव्हिलियर्सचे अवघ्या ३७ चेंडूंत वादळी शतक

आपल्या भूमिकेचे समर्थन करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिका आणि रशियामध्ये झालेला हा तेल करार अत्यंत मोठा आहे. आमच्या मागणीनुसार रशियाकडून आता मोठ्या प्रमाणावर तेल अमेरिकेत येणार आहे. या सहकार्याबद्दल मी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मनापासून आभार मानतो.”

भारतासह मित्रदेशांवर निर्बंध, मग स्वतःसाठी सवलत का?

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प प्रशासनाने भारतासह अनेक देशांना रशियाकडून तेल आयात न करण्याचा इशारा दिला होता आणि उल्लंघन करणाऱ्यांवर दुय्यम निर्बंध (Secondary Sanctions) तसेच टॅरिफ लादण्याचा इशारा दिला होता. मात्र आता अमेरिकेने स्वतःच्या देशांतर्गत इंधनाची गरज भागवण्यासाठी थेट पुतिन यांच्याशीच हातमिळवणी केल्याने ट्रम्प यांच्या दुटप्पी भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार टीका सुरू झाली आहे. अमेरिकेच्या या कोलांटउडीनंतर आता भारत सरकार काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button