ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभारी प्राचार्य प्रा. योगेश विजय पाटील यांना संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विषयात ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान

 पिंपरी चिंचवड : सिद्धांत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (सुदुंबरे, पुणे) येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्रा. पाटील योगेश विजय यांनी संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान (Computer Science & Information Technology) या विषयात सर्वोच्च मानाची ‘पीएच.डी.’ (विद्यावाचस्पती) पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे. राजस्थान येथील प्रतिष्ठित श्याम विद्यापीठ (दौसा) येथून त्यांनी हे संशोधन पूर्ण करून ही सनद प्राप्त केली.

​प्रा. डॉ. योगेश पाटील यांनी ‘WebHeart: Crafting an Open-Source Symphony for Cardiac and Diabetic Harmony’ या अत्यंत महत्त्वपूर्ण व महत्त्वपूर्ण विषयावर आपले संशोधन सादर केले होते.

​ आरोग्य क्षेत्रासाठी उपयुक्त संशोधन

त्यांच्या या संशोधनामध्ये हृदयविकार (Cardiac) आणि मधुमेह (Diabetic) यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना दैनंदिन आरोग्य व्यवस्थापनात मदत करणाऱ्या एका मुक्त-स्रोत (Open-Source) डिजिटल ॲप्लिकेशनच्या विकास आणि मूल्यमापनावर विशेष भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांचे जीवन सुकर करणे आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावी बनवणे, हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा –  प्रियदर्शनी स्कूल, मोशी, पुणे येथील विद्यार्थिनी रुही बडगुजर हिला अखिल भारतीय निमंत्रित कराटे स्पर्धेत रौप्यपदक

​या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक डॉ. गिरीश दीक्षित तसेच महात्मा गांधी विद्यापीठ (मेघालय) चे कुलगुरू डॉ. सागर ओ. मांजरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

​ सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन

शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय आणि सामाजिक दृष्टीने उपयुक्त संशोधन केल्याबद्दल डॉ. योगेश पाटील यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धांत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, कॉलेजचे प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, कुटुंबीय, तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button