Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कामाठीपुरा पुनर्विकासाला नवी गती; राज्यासाठी दिशादर्शक प्रकल्प उभारण्याचे डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश

अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांची समिती गठित होणार; नागरिकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

मुंबई : कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प गृहनिर्माण क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक आणि आदर्श ठरेल अशा पद्धतीने राबविण्याचे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कामाठीपुरा विकास समितीच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

कामाठीपुरा विकास समितीच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत डॉ. भोयर यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल. विकास समितीने मांडलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्या पूर्ण करण्यासाठी नियमांनुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुनर्विकास प्रकल्पात कामाठीपुरातील नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. प्रकल्पाला गती देण्यासाठी विकास समितीने शासनासोबत समन्वयाने काम करावे. कायदे आणि नियमांच्या चौकटीत राहून नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित करण्यात येणाऱ्या समितीच्या माध्यमातून विविध विभाग, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक विकास समिती यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पातील प्रलंबित बाबींवर वेगाने निर्णय घेऊन पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यास मदत होणार आहे.

बैठकीस खासदार अरविंद सावंत, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमीन पटेल, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच कामाठीपुरा विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button