TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

SIR आंदोलनासाठी काँग्रेस खासदारांची हजेरी अनिवार्य? राहुल गांधींचा वेणुगोपालांना आदेश; गैरहजर खासदारांना कारणे दाखवा नोटीस

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाला INDIA आघाडीची ताकद; राहुल गांधींचे ममता, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव यांना आवाहन, राष्ट्रपतींच्या भेटीचीही तयारी

नवी दिल्ली : Special Intensive Revision (SIR)च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि INDIA आघाडीने निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन तीव्र केले आहे. गुरुवारी आंदोलनाचा सलग तिसरा दिवस असून राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे खासदार राजघाटावर आंदोलनासाठी पोहोचले.

दरम्यान, आंदोलनात काँग्रेसच्या सर्व खासदारांनी उपस्थित राहावे, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांना गेल्या दोन दिवसांच्या आंदोलनात अनुपस्थित राहिलेल्या खासदारांची यादी तयार करण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. योग्य कारण नसलेल्या अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचनाही त्यांनी केल्याचे वृत्त आहे.

INDIA आघाडीतील नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

SIR आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत राहुल गांधी यांनी INDIA आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती आहे. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी खासदारांसाठी भोजन बैठकीचे आयोजन केले. त्यानंतर विरोधी खासदार राजघाटाच्या दिशेने रवाना झाले. दिल्ली पोलिसांनी राजघाट परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले असतानाही विरोधकांनी आंदोलन सुरू ठेवले.

हेही वाचा –  MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी वाहतूक कोंडीचा मुद्दा; रोहित पवार आक्रमक, पोलिसांना १५ मिनिटांचा अल्टिमेटम

ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. SIR आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर INDIA आघाडीच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रपती सचिवालयाकडून शिष्टमंडळाची संख्या १० सदस्यांपर्यंत ठेवण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.

ममता बॅनर्जी यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका व्यक्त केली असून, राष्ट्रपतींची भेट घेण्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. मात्र, आंदोलनाची पुढील रणनीती आधीच जाहीर करता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

SIR प्रक्रियेत कथित अनियमितता असल्याचा आरोप करत INDIA आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. निवडणूक आयोग आणि भाजपने विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत.

सलग तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. आता काँग्रेसच्या खासदारांची उपस्थिती, INDIA आघाडीतील घटक पक्षांचा सहभाग आणि राष्ट्रपतींसोबत होणारी संभाव्य भेट यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button