Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ जाहीर

Team India | भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिका सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ तसेच ‘भारत अ’ (India A) संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेतील सर्वांत मोठी बातमी म्हणजे अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे तब्बल ४ वर्षांनंतर भारतीय टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यरकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून, तिलक वर्मा उपकर्णधार असणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय संघात परतण्यासाठी झगडणाऱ्या भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. नव्या आणि जुन्या दोन्ही चेंडूंवर स्विंग मिळवण्याची कला आणि पॉवरप्लेमध्ये बळी मिळवण्याचे त्याचे कौशल्य लक्षात घेता, आगामी २०२७ च्या विश्वचषकाच्या दृष्टीने निवड समितीने त्याला पुन्हा एकदा संघात संधी दिली आहे. या संघात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी, प्रिन्स यादव आणि नमन धीर या नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.

हेही वाचा

“हम कर के रहेंगे, We Will Do It!”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकसित भारतासाठी नवा मंत्र

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी ‘भारत अ’ संघ:

ध्रुव जुरेल (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, ऋषभ पंत* (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, यश राठोड, आर. स्मरण, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, आकिब नबी, आकाश दीप, मुकेश चौधरी, अंशुल कंबोज, मुकेश कुमार.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button