एमआयटीच्या ‘सायफारी ५.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० संस्थांतील ८७८ विद्यार्थ्यांचा सहभाग
‘नॉलेज फ्युजन फेस्ट’ अंतर्गत स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

आळंदी | एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथे नॉलेज फ्युजन फेस्ट’ अंतर्गत ‘सायफारी ५.०’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे व परिसरातील ४० महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील ८७८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वेब डिझायनिंग, कोडिंग, रोबोटिक्स, तांत्रिक आव्हाने, संगणकीय खेळ, खजिना शोध, वेशभूषा सादरीकरण, नृत्य, गायन, चित्रफित निर्मिती, चित्रकला, व्यंगचित्र रचना, टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू निर्मिती तसेच विक्री व विपणन अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि कलागुण सादर करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा
ज्ञान, कुतुहल, मनोरंजनाचा संगम टायटॅनिक प्रदर्शनाचे बुधवारी उद्घाटन
या उपक्रमाचे आयोजन संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी आणि संगणकशास्त्र व अनुप्रयोग शाखेच्या अधिष्ठाता डॉ. रश्मी लाड यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. संगीता बोर्डे यांच्या सहकार्याने डॉ. भालचंद्र पवार आणि डॉ. मयुरी बापट यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्राध्यापक, विद्यार्थी समन्वयक आणि स्वयंसेवकांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
‘सायफारी ५.०’मुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण, कौशल्यप्रदर्शन आणि आंतरमहाविद्यालयीन संवादाचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.





