पिंपरी / चिंचवडताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

चिंचवड | चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रातिभा ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा, शांतता, साधेपणा आणि स्वच्छता या महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस प्राचार्या डॉ . वनिता कुऱ्हाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्याच्या समवेत प्राध्यापक व विद्यार्थानी अभिवादन करून स्वच्छता, शिस्त, शांतता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे पालन करण्याचा सामुहिक संकल्प केला. “तुम्हाला जगात जो बदल पहावयाचा आहे, तो बदल स्वतःपासून सुरू करा” असा कानमंत्र देत , महात्मा गांधी यांच्या विचारातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.

हेही वाचा

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

या उपक्रमाचे आयोजन सोशल वेल्फेअर कमिटीचे डॉ. रघुनाथ ताम्हाणे तसेच इको क्लबच्या प्रा. सुनीता गायकवाड, प्रा. मच्छिंद्र सोनवणे आणि प्रा. गोविंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सुनीता पटनाईक, प्रा. जस्मिन फरास आणि प्रा. वैशाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा अंगीकार करून स्वच्छ, शिस्तबद्ध आणि जबाबदार समाजनिर्मितीत योगदान द्यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button