Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

अमरावतीच्या कुमकुम मोहोडचा जपानमध्ये ऐतिहासिक पराक्रम! शूट-ऑफमध्ये दक्षिण कोरियाला नमवून जिंकले सुवर्णपदक

Asian Games 2026 | महाराष्ट्र कन्या कुमकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णवेध घेत क्रीडा विश्वात इतिहास घडवला आहे. अमरावतीच्या या युवा तिरंदाजाने महिला एकेरी रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम लढतीत दक्षिण कोरियाच्या बलाढ्य येजिन ओह हिचा थरारक ‘शूट-ऑफ’मध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकावले. १९७८ नंतर, म्हणजेच तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळवून देणारी कुमकुम ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे चालू स्पर्धेत भारताच्या खात्यात १७ वे सुवर्णपदक जमा झाले आहे.

अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्या दोन सेटनंतर कुमकुम १-३ अशी पिछाडीवर पडली होती. मात्र, तिने उत्कृष्ट संयम दाखवत स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला. चौथ्या सेटमध्ये कोरियन खेळाडूने पुन्हा ५-३ अशी आघाडी घेतली. पराभवाच्या छायेत असताना पाचव्या सेटमध्ये कुमकुमने सलग तीन परफेक्ट ‘१०’ गुण मारत स्कोअर ५-५ असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामना थेट ‘शूट-ऑफ’मध्ये गेला. शूट-ऑफमध्ये येजिन ओहने ८ गुणांवर निशाणा साधला, तर कुमकुमने न डगमगता अचूक मध्यभागी १० गुणांचा अचूक वेध घेतला आणि भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

हेही वाचा

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: बॉक्सिंगमध्ये एकाच दिवशी ‘गोल्डन हॅटट्रिक’, सुवर्णपदकांची संख्या १४ वर

एकाच स्पर्धेत दोन सुवर्ण अन् एक रौप्य पदकाची कमाई

कुमकुमचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने अंकिता भकत आणि किर्ती शर्मा यांच्यासोबत महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, धीरज बोम्मदेवरासोबत मिश्र रिकर्व्ह प्रकारात तिने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

तिरंदाजीत भारतीय खेळाडूंचा दबदबा

या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी नेहमीप्रमाणे आपली ताकद सिद्ध केली आहे. आतापर्यंत तिरंदाजीत भारताने एकूण ८ पदके जिंकली असून, यात तब्बल ५ सुवर्ण, २ रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button