ICC ODI World Cup 2027: वनडे विश्वचषकाचं अधिकृत वेळापत्रक जाहीर; १० ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान महामुकाबला
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात १४ संघ, १२ मैदानं आणि ५७ सामने; २ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात, २१ नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये अंतिम सामना

मुंबई : क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या ICC Men’s ODI World Cup 2027 चं अधिकृत वेळापत्रक गुरुवारी, १ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आलं. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत १४ संघ, १२ मैदानं आणि एकूण ५७ सामने खेळवले जाणार आहेत. तब्बल २४ वर्षांनंतर वनडे विश्वचषकाचं आफ्रिकेत पुनरागमन होत आहे.
१० ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना
विश्वचषकातील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १० ऑक्टोबर २०२७ रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा समावेश एकाच ग्रुपमध्ये करण्यात आला आहे.
भारताच्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफायर A यांचा समावेश आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केपटाऊनमध्ये होणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरला पाकिस्तान, १४ ऑक्टोबरला अफगाणिस्तान, १७ ऑक्टोबरला क्वालिफायर A आणि २४ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध भारताचे सामने होणार आहेत.
२ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात
स्पर्धेची सुरुवात २ ऑक्टोबर २०२७ रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे होणाऱ्या तीन संघांच्या Super Series ने होईल. पात्रता फेरीतील तीन संघांमध्ये राऊंड-रॉबिन पद्धतीने सामने होतील आणि त्यातील अव्वल संघ ग्रुप स्टेजमध्ये प्रवेश करेल.
ग्रुप स्टेज ७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ आणि चौथ्या क्रमांकावरील सर्वोत्तम संघ Super 7 फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना २१ नोव्हेंबर २०२७ रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
ग्रुप ए आणि ग्रुप बी
ग्रुप ए :
भारत
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
अफगाणिस्तान
झिम्बाब्वे
क्वालिफायर A
ग्रुप बी :
न्यूझीलंड
दक्षिण आफ्रिका
श्रीलंका
इंग्लंड
बांगलादेश
क्वालिफायर B
१२ मैदानांवर रंगणार सामने
दक्षिण आफ्रिका :
वाँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सेंच्युरियन
न्यूलँड्स, केपटाऊन
किंग्समीड, डरबन
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
मंगाउंग ओव्हल, ब्लोमफॉन्टेन
बोलँड पार्क, पार्ल
कुगोम्पो सिटी (पूर्वी ईस्ट लंडन)
झिम्बाब्वे :
हरारे स्पोर्ट्स क्लब
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
मोसी-ओआ-टुन्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, व्हिक्टोरिया फॉल्स
नामिबिया :
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
भारताचे ग्रुप स्टेजमधील सामने
तारीख सामना मैदान
७ ऑक्टोबर २०२७ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया केपटाऊन
१० ऑक्टोबर २०२७ भारत विरुद्ध पाकिस्तान जोहान्सबर्ग
१४ ऑक्टोबर २०२७ भारत विरुद्ध अफगाणिस्तान त्श्वाने
१७ ऑक्टोबर २०२७ भारत विरुद्ध क्वालिफायर A ब्लोमफॉन्टेन
२४ ऑक्टोबर २०२७ भारत विरुद्ध झिम्बाब्वे व्हिक्टोरिया फॉल्स
नवा फॉरमॅट, ५७ सामन्यांचा थरार
२०२च्या विश्वचषकासाठी ICC ने नवा फॉरमॅट आणला आहे. सुरुवातीला तीन संघांची Super Series, त्यानंतर १२ संघांची दोन गटांमध्ये विभागणी, त्यातून Super 7 आणि अखेरीस उपांत्य फेरी व अंतिम सामना असा स्पर्धेचा प्रवास असेल. Super 7 मध्ये प्रत्येक संघ सहा सामने खेळणार असून ही फेरी २५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान होईल.
तिकिटांसाठी ICC ने १ ऑक्टोबरपासून बॅलेट प्रक्रियाही सुरू केली आहे. चाहत्यांना २१ नोव्हेंबर २०२६पर्यंत तिकिटांसाठी नोंदणी करता येणार आहे.





