Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

Asian Games: विथ्या रामराजचा नवा राष्ट्रीय विक्रम; ४०० मीटर हर्डल्समध्ये ऐतिहासिक कांस्यपदक

Vithya Ramraj | भारतीय धावपटू विथ्या रामराज हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. महिलांच्या ४०० मीटर हर्डल्स (अडथळा शर्यत) प्रकारात ५४.७५ सेकंदांची शानदार वेळ नोंदवत विथ्याने कांस्यपदकाला गवसणी घातली. या नेत्रदीपक कामगिरीसह तिने ‘पय्योली एक्स्प्रेस’ पी. टी. उषा यांचा तब्बल ४२ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे.

पी. टी. उषा यांनी १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकदरम्यान ५५.४२ सेकंदांची नोंद करत हा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला होता. भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासातील हा सर्वाधिक काळ अबाधित राहिलेल्या विक्रमांपैकी एक मानला जात होता. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्या या विक्रमाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचली होती; मात्र अवघ्या ०.०१ सेकंदाने तिची बरोबरी हुकली होती. यावेळी मात्र २८ वर्षीय विथ्याने ५४.७५ सेकंदांची नोंद करत जुना विक्रम धुळीस मिळवला. विक्रम मोडल्याचे समजताच कोईम्बतूरच्या या धावपटूने ट्रॅकवरच नाचून आपला आनंद व्यक्त केला.

हेही वाचा

Gyanesh Kumar: ठाण्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

विथ्याचे स्पर्धेतील दुसरे पदक; भारताचा दबदबा कायम

विथ्या रामराजचे आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर हर्डल्स प्रकारातील हे सलग दुसरे कांस्यपदक ठरले आहे. याआधी तिने चालू स्पर्धेत मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक पटकावले होते, त्यामुळे हे तिचे वैयक्तिक दुसरे पदक ठरले आहे. तसेच या क्रीडा प्रकारात भारताने आशियाई पातळीवर सलग तिसऱ्यांदा पदक राखले आहे (२०१८ जकार्ता येथे अनू राघवनने कांस्य जिंकले होते).

अत्यंत चुरशीची अंतिम फेरी

ही अंतिम फेरी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान ठरली. युएईच्या मरियम करीमने ५४.३१ सेकंदांच्या विक्रमी वेळेसह सुवर्णपदक, तर कझाकिस्तानच्या अदेलिना झेम्सने ५४.५८ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. भारताची अनुभवी धावपटू अनू राघवन हिनेही ५५.८८ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून पाचवे स्थान पटकावले. या कांस्यपदकासह ॲथलेटिक्स प्रकारात भारताच्या पदकांची संख्या आता १४ (६ रौप्य, ८ कांस्य) वर पोहोचली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button