Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नांदेडच्या शेतकऱ्यांना अतुल सावे यांचा दिलासा; ‘शासन खंबीरपणे पाठीशी, सर्वतोपरी मदत करू’

पीक परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद; पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार

नांदेड : राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध गावांना भेट देत पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. हदगाव तालुक्यातील जगापूर व तामसा, भोकर तालुक्यातील हळदा व मोघाळी, उमरी तालुक्यातील सोमठाणा, नायगाव तालुक्यातील पळसगाव आणि नांदेड तालुक्यातील तुप्पा येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेषतः महिला शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे सांगत सावे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  विराट कोहलीच्या विक्रमी शतकाने भारताचा दणदणीत विजय; वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सने मात

उर्वरित दोन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश?

जिल्ह्यातील उर्वरित दोन तालुक्यांचाही ट्रिगर-२ अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत पालकमंत्री सावे यांनी माहिती दिली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल घेण्यात आला असून, या दोन्ही तालुक्यांचाही समावेश केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पीक परिस्थितीची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेत प्रशासनाला आवश्यक बाबींची माहिती दिली. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत स्थानिक पातळीवरील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले.

पाहणी दौऱ्यात लोकप्रतिनिधींची उपस्थिती

जगापूर आणि सोमठाणा येथे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, हळदा व मोघाळी येथे खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण, पळसगाव येथे आमदार राजेश पवार, तर तुप्पा येथे आमदार आनंदराव तिडके-बोंढारकर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यादरम्यान संबंधित गावांतील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button