TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

हॉर्मुझची सामुद्रधुनी आता ‘ट्रम्प स्ट्रेट’! इराणच्या प्रस्तावानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सोशल मीडियावर नकाशा शेअर

Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अनपेक्षित कृतीने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक नकाशा प्रसिद्ध केला असून, त्यावर या ऐतिहासिक जलमार्गाचा उल्लेख चक्क ‘ट्रम्प स्ट्रेट’ (Trump Strait) असा केला आहे. इराणने अमेरिकेसमोर काही अटींवर हा जलमार्ग खुला करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर ट्रम्प यांची ही पहिली जाहीर प्रतिक्रिया समोर आली आहे.

इराणने अमेरिकन नौदलाची नाकेबंदी उठवणे, इराणच्या कच्च्या तेलाच्या विक्रीवरील जाचक निर्बंध शिथिल करणे आणि लेबनॉनसह तातडीने युद्धबंदी लागू करणे, या प्रमुख अटींवर आठवड्याभरात हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची तयारी दर्शवली होती. या प्रस्तावावर अमेरिकन मध्यस्थांशी सकारात्मक आणि प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील बैठका आणि अमेरिकेशी झालेली अप्रत्यक्ष चर्चा आटोपून इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान न्यूयॉर्कहून तेहरानकडे रवाना झाले आहेत. महासभेतील भाषणात त्यांनी ट्रम्प यांच्या “इराण नष्ट करू” या धमकीचा तीव्र निषेध केला असला, तरी राजनैतिक संवाद आणि मुत्सद्देगिरीचे दरवाजे अजूनही उघडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

‘संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

दुसरीकडे, वेस्ट बँकेत इस्रायली नागरिकांनी नैसर्गिक पाण्याच्या झऱ्यांवर आणि ऐतिहासिक वारसा स्थळांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. हे जलस्रोत स्थानिक २८ लाख पॅलेस्टिनी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जॉर्डन व्हॅलीमध्ये एका इस्रायली ऑपरेटरने पॅलेस्टिनी गावाकडे जाणारी थेट पाण्याची पाईपलाईन कापून पाणी एका तलावाकडे वळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सौदी अरेबियाकडून हुतींचा क्षेपणास्त्र हल्ला उधळला

आखातातील तणावादरम्यान येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर डागलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हवेतच यशस्वीरीत्या नष्ट करण्यात आल्याचा दावा सौदी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मल्की यांनी केला. हे क्षेपणास्त्र सौदीच्या खामिस मुशायत शहराच्या दिशेने डागण्यात आले होते. या हल्ल्याचा गल्फ कोऑपरेशन कौन्सिलने (GCC) तीव्र शब्दांत निषेध करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडे कारवाईची मागणी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button