पिंपरी / चिंचवडताज्या घडामोडी

‘प्रारंभ’च्या माध्यमातून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आकुर्डी, पुणे येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

पिंपरी-चिंचवड :  डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी, पुणे येथे प्रथम वर्ष बी. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘प्रारंभ’ इंडक्शन डे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात या कार्यक्रमातून झाली.

कार्यक्रमास डॉ. राजेंद्र तलवारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे प्रमुख पाहुणे, तर श्री. संदीप महाजन, संचालक व मानव संसाधन विभाग प्रमुख, सार्क विभाग, अस्सा अब्लॉय हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस संचालक, श्री. बी. एच. शर्मा, मुख्य वित्त अधिकारी, तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या, डॉ. छाया तिरविर उपस्थित होत्या.

हेही वाचा –  आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओइ, आकुर्डी आणि पीसीसीसीएस, चिंचवड विजयी

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथींनी वास्तुकलेची समाजातील भूमिका व भावी वास्तुविशारदांच्या जबाबदाऱ्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी शिस्त व महाविद्यालयीन नियमांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास, परीक्षा – संबंधित अनुपालन, महाविद्यालयीन मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आली तसेच महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापकांची ओळख करून देण्यात आली.

या कार्यक्रमास मा. सतेज पाटील, अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान, आकुर्डी शैक्षणिक संकुल; मा. तेजस पाटील, विश्वस्त; मा. श्रीमती स्नेहा तेजस पाटील, संचालक कार्यप्रणाली; आणि रिअर

ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस संचालक, डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॅम्पस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आनंदी चेहरे, गोड आठवणी आणि प्राध्यापकांच्या शुभेच्छांसह कार्यक्रमाची सांगता झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button