TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत रोजगार महाकुंभ; २० ठिकाणी थेट नोकरीची संधी

१०वी ते पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा आणि व्यावसायिक कौशल्यधारक उमेदवारांना सहभागी होता येणार; पूर्वनोंदणीचे आवाहन

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारच्या वतीने मंगळवारी राज्यभरात रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबई शहरात विविध २० ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून, यामध्ये विविध क्षेत्रातील खासगी कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि उद्योजक सहभागी होणार आहेत.

मुंबई शहर व परिसरातील बँकिंग, रिटेल, आयटी, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांना रोजगार मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना थेट कंपन्यांशी संवाद साधून रोजगाराच्या संधी मिळवता येणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात १०वी, १२वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा तसेच विविध व्यावसायिक कौशल्य असलेले पात्र उमेदवार सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन पूर्वनोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील चर्चगेट, माटुंगा, फोर्ट, दादर, सायन, वडाळा, भायखळा यांसह विविध भागांतील शैक्षणिक व कौशल्यविकास संस्थांमध्ये हे मेळावे होणार आहेत. यामध्ये एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ (चर्चगेट), रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (फोर्ट), एमव्हीआयआरडीसी जागतिक व्यापार केंद्र (कफ परेड) तसेच न्यायवैद्यक शास्त्र संस्थेचा समावेश आहे.

हेही वाचा –  पीसीसीओईआर येथे ‘आविष्कार’ पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न

तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये सेंट झेवियर्स तांत्रिक संस्था (माहीम), मुंबई तांत्रिक अभियांत्रिकी विद्यालय (दादर), एम.एच. साबू सिद्दिक तंत्रनिकेतन (भायखळा) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आतिथ्य व्यवस्थापन संस्थेतही रोजगार मेळावे होणार आहेत.

याशिवाय रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, गुरु नानक खालसा महाविद्यालय, श्रीमती मणीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय, डी. जी. रुपारेल महाविद्यालय, गुरु नानक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (सायन), एस.आय.डब्ल्यू.एस. एन. आर. स्वामी महाविद्यालय (वडाळा), सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (फोर्ट), डेव्हलर्न तंत्रज्ञान प्रायव्हेट लिमिटेड (दादर), जय हिंद महाविद्यालय, सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, भवन एच. सोमाणी महाविद्यालय आणि लाला लजपतराय वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (महालक्ष्मी) येथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांनी रोजगार महाकुंभाचा लाभ घेऊन पूर्वनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button