Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सह-संयोजक आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

CJP | आसामची राजधानी गुवाहाटी येथे रविवारी सकाळी राजकीय वातावरण चांगलेच तापले. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आसाम पोलिसांनी मेळाव्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना अज्ञात स्थळी हलवल्याचा दावा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला असून, या कारवाईवरून आसाम पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गुवाहाटीतील चौधरी टिळा भागात रविवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने स्वयंसेवकांच्या एका छोट्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत रस्ते बंद केले आणि कार्यकर्ते एकत्र येण्याआधीच आशुतोष रांका यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा

दहशतवादाविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’; ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

ताब्यात घेण्यापूर्वी आशुतोष रांका यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर थेट राजकीय हल्ला चढवला. “आसाममधील सरकारी शाळांची दुरवस्था आणि खरी परिस्थिती देशासमोर उघडी पडेल या भीतीने मुख्यमंत्री घाबरले आहेत. याशिवाय काझीरंगा परिसरातील स्थानिक नागरिकांचे हक्क हिरावून तेथील जमीन, जंगल आणि पाणी बड्या कॉर्पोरेट्सच्या घशात घातले जात आहे; हे सत्य लपवण्यासाठीच आमच्यावर ही दडपशाही केली जात आहे,” असा गंभीर आरोप रांका यांनी केला.

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

या कारवाईनंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली की, “आशुतोष रांका आणि सीजेपी टीमला पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले आहे. ते केवळ एका साध्या मेळाव्यासाठी गेले होते.” या घडामोडींनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांचे बॅरिकेड्स, पाण्याचे टँकर आणि संबंधित व्यंगचित्रात्मक मीम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button