TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावतीत लाखो रुपयांचा औषधसाठा कालबाह्य; जिल्हा परिषदेच्या औषधी भांडारगृहात आढळला साठा

ग्रामीण रुग्णांना मोफत वाटपासाठी उपलब्ध औषधे अडगळीत पडून खराब; औषध प्रशासनाच्या तपासणीत प्रकार उघड

अमरावती : अमरावती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडारगृहात लाखो रुपयांचा औषधसाठा कालबाह्य झाल्याची बाब समोर आली आहे. ग्रामीण भागातील सामान्य आणि गरजू रुग्णांना मोफत वाटप करण्यासाठी उपलब्ध झालेली औषधे वेळेत वितरित न झाल्याने ती कालबाह्य झाल्याची तक्रार औषध प्रशासनाकडे करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या औषधी भांडारगृहाची तपासणी केली. सहआयुक्त अनिल माणिकराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासणीदरम्यान एका अडगळीच्या खोलीत मोठ्या प्रमाणात कालबाह्य औषधसाठा आढळून आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –  प्रथिने हवेत! शाकाहारी लोकांसाठी 5 सुपरफूड्स ठरतील मोठं वरदान

ग्रामीण भागातील काही आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणातील औषधे साठवणुकीत पडून कालबाह्य झाल्याने औषध व्यवस्थापन आणि वितरणाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कालबाह्य औषधांची नियमानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यामुळे या औषधसाठ्याची खरेदी, साठवणूक, वितरण आणि कालबाह्य होईपर्यंत झालेल्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, फार्मासिस्ट दिनाच्या दिवशीच हा कालबाह्य औषधसाठा आढळून आल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू झाली आहे. आता औषध प्रशासनाच्या तपासणीत नेमकी काय माहिती समोर येते आणि या प्रकरणात जबाबदारी निश्चित होते का, याकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button