TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा; तीन दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची पुणे जिल्ह्यात बांधावर जाऊन पाहणी

पुणे : राज्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील पहिली अधिसूचना काढण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या दौऱ्यावर असताना भरणे यांनी देऊळगाव, मोरगाव, मुर्टी, नावळी आणि कोळविहीरे या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची तसेच उपलब्ध पाणी परिस्थितीची पाहणी केली. पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांवर झालेल्या परिणामाची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.

“शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे भरणे यांनी सांगितले.

हेही वाचा –  बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप

पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांत पावसाचा खंड

पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याचे भरणे यांनी सांगितले. हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून पावसाचा खंड आहे. भोर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड नोंदवण्यात आला आहे.

तर बारामती, शिरूर, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खेड या तालुक्यांमध्ये चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दीर्घ खंडाचा खरीप पिकांवर परिणाम झाला असून, परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाणी आणि चाऱ्याचेही नियोजन

दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम केवळ पिकांपुरता मर्यादित राहू नये, यासाठी पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबतही नियोजन करण्यात येत आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करून त्याआधारे शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळे आगामी काळात पंचनाम्यांच्या अहवालानुसार मदतीची कार्यवाही केली जाणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button