ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एमआयटी एसीएस महाविद्यालय, आळंदी येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६’ उत्साहात संपन्न

आळंदी | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (ACS) महाविद्यालय, आळंदी येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) २०२६’ चे अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. या हॅकाथॉनमध्ये एकूण ८४ संघांमधून ५०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध क्षेत्रांतील दैनंदिन व सामाजिक समस्यांवर नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि व्यावहारिक उपाय सादर केले. चुरशीच्या परीक्षण प्रक्रियेअंती यातील तब्बल ५० संघांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड (नामांकन) करण्यात आली आहे.

सहभागी संघांचे मूल्यमापन नाविन्यता (Innovation), तांत्रिक व्यवहार्यता, समस्या निवारण क्षमता, उपाययोजनेची उपयुक्तता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची शक्यता या निकषांवर करण्यात आले. या स्पर्धेचे तज्ज्ञ परीक्षक म्हणून श्री. रोहनकुमार रमेश सावंत, श्री. हितेश लोढा, श्री. प्रणव शिंदे आणि श्री. सार्थक नरनोर यांनी काम पाहिले व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

हेही वाचा

ज्ञानेश कुमार यांना तात्काळ तुरुंगात टाका; उद्धव ठाकरेंची मागणी

महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिलचे उपाध्यक्ष श्री. अभिजित नेटके आणि कन्व्हेनर डॉ. संदीप ढवळे यांनी उपक्रमासाठी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नेटके नियोजन समन्वयक डॉ. प्रिती भारंभे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, तर श्री. आर. झेड. शेख यांनी सह-समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली.

या हॅकाथॉनमुळे विद्यार्थ्यांमधील कल्पकता, तांत्रिक कौशल्ये, संघभावना आणि उद्योजकतेला मोठी चालना मिळाली असून, राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या ५० संघांचे यश महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील यशाचा नवा टप्पा ठरले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button