पाटी-पुस्तकताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नूतन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा ‘नूतन अनुगम’ स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

पिंपरी | नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात मध्ये प्रथम वर्ष बी.टेक.च्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘नूतन अनुगम – २०२६’ या कार्यक्रमाचे नुकतेच प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास एटीओएस कंपनीचे माजी उपाध्यक्ष माधव कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर आणि आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, संस्थेचे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, पीसीईटी व नूतन समूहाचे ट्रेनिग अँड प्लेसमेंट विभागाचेअधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, संचालक प्रा. डॉ. प्रमोद पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामचंद्र जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक. डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांसमोर चारही वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा लेखाजोखा मांडला. डाॅ.शिकारपुर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यावसायिक कौशल्ये, उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा यासंबंधी मार्गदर्शन केले. सचिन इटकर यांनी उद्योजकता, डिजिटल साक्षरता तसेच माधव कुलकर्णी यांनी करिअर विकास आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शिस्त, जिज्ञासा आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा, असा संदेश दिला.

हेही वाचा

मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये ‘हिंदी दिन’ उत्साहात साजरा

संजय (बाळा) भेगडे यांनी संस्थेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडताना स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी बीजारोपण केलेल्या या संस्थेत शालेय शिक्षण देतानाच स्वातंत्र्यासाठी आवश्यक असणाऱ्या सशस्त्र क्रांतीचे बीजदेखील या संस्थेत रोवल्याचे नमुद केले. राजेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्याचा सल्ला दिला. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी शैक्षणिक प्रवासात शेवटी होणाऱ्या प्लेसमेंट संदर्भात आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रथम वर्ष अधिष्ठाता डॉ. शेखर रहाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा तनपुरे, डॉ. तेजस्विता काजळे आणि देवदत्त दीक्षित यांनी केले. सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रजिस्ट्रार विजय शिर्के ,प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. अर्चना येवले, प्रा. प्रेमकुमार कोल्ले व नियोजन प्रमुख डॉ. मिलिंद ओव्हाळ व प्रा. अमोल बडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button