Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून विविध जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई | मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२२ सप्टेंबर : नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

२३ सप्टेंबर : नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

हेही वाचा

Asian Games 2026: भारत-जपान ऐतिहासिक लढत ‘या’ दिवशी, जाणून घ्या वेळ आणि संपूर्ण संघ

२४ सप्टेंबर : सातारा, सातारा घाट, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

२५ सप्टेंबर : वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यात विसर्जन मिरवणुका आणि उत्सवाचा काळ सुरू असतानाच पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडांखाली किंवा पत्र्यांच्या शेडखाली उभे राहणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button