TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन

महापालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज; महिला, लहान मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे महापौर रितू तावडे यांचे आवाहन

मुंबई : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) व्यापक तयारी केली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विसर्जनाच्या तयारीची माहिती दिली. तसेच मुंबईकरांनी संयमाने आणि नियमांचे पालन करून बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत ३८५ कृत्रिम तलाव (Artificial Ponds) तयार करण्यात आले आहेत. तर सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींसाठी जुहू चौपाटी, गिरगाव यांसारख्य ठिकाणी समुद्रात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा –  विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाचा नाशिकमध्ये अपघात

गौरी-गणपतीच्या सातव्या दिवसाच्या विसर्जनाची माहिती देताना महापौरांनी सांगितले की, आतापर्यंत १८ हजार ८१८ गौरी-गणपतींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले आहे. अनंत चतुर्दशीला होणाऱ्या मुख्य विसर्जनासाठी महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज राहणार आहे.

विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी संयम राखावा, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि गर्दीच्या ठिकाणी महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले. मुंबई आरोग्यदायी, समृद्ध आणि एकोप्याने नांदणारी व्हावी, अशी प्रार्थना बाप्पाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button