ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाचा नाशिकमध्ये अपघात

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चासाठी नाशिककडे जात असताना दुर्घटना

पिंपरी-चिंचवड: अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चासाठी नाशिककडे जात असताना विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये आमदार गोरखे यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. या वाहनात आमदार अमित गोरखे यांच्यासह मारुती जाधव, बाबासाहेब रसाळ, आनंद सुतार, महेश खंदारे, वाहनचालक रामचंद्र जाधव तसेच अंगरक्षक सूरज आणि अभिजीत उपस्थित होते.

या अपघातात आमदार अमित गोरखे थोडक्यात बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा –  महाराष्ट्रात सहयोगी व आरोग्यसेवा परिषदेच्या कामाला वेग; आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या शिक्षण-प्रशिक्षणाला नवी दिशा

आमदार अमित गोरखे हे अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीच्या समर्थनार्थ आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीतही ते सहभागी झाले होते आणि २९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रस्तावित महामोर्चासाठीही त्यांची भूमिका चर्चेत आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण, वाहनांचे झालेले नुकसान आणि वाहनातील इतर व्यक्तींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पुढील अधिकृत माहितीनंतरच या बाबतची स्थिती निश्चित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button