“आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी अन् आता TMC”; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi | निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्षनाव व चिन्हाच्या वाटपावर सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसबाबत हा मोठा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा दाखला देत तीव्र नाराजी व्यक्त केली. “आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस. प्रत्येक वेळी तोच ठरलेला पॅटर्न वापरला जात आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून आधी एखादा पक्ष फोडतात आणि मग त्या मूळ पक्षाचे निवडणूक चिन्हच हिसकावून घेतले जाते,” असा थेट आरोप त्यांनी केला.
हेही वाचा
३० चेंडू, १० षटकार अन् शतक! अभिषेक शर्माचा टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विश्वविक्रम
पहले शिवसेना, फिर NCP और अब तृणमूल कांग्रेस।
हर बार एक ही पैटर्न – BJP और चुनाव आयोग मिलकर एक पार्टी को तोड़ते हैं। फिर उसका चुनाव चिन्ह छीन लिया जाता है।
जब पूरी की पूरी पार्टी चोरी हो सकती है, तो करोड़ों भारतीयों के वोट चोरी होना भी हैरानी की बात नहीं।
वोट चोरी। सरकार चोरी। अब पार्टी चोरी – ये हमारे लोकतांत्रिक पतन के प्रतीक बन गए हैं।
ECI की संवैधानिक ज़िम्मेदारी जनादेश की रक्षा करना है – मगर उल्टा वो उन ताकतों की मदद कर रहा है, जो जनता के फैसले को ही पलट देते हैं।
यह लड़ाई सिर्फ़ ममता बनर्जी जी की नहीं है। यह हर राजनीतिक दल, हर मतदाता की लड़ाई है जो स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव चाहता है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2026
लोकशाहीच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत राहुल गांधी पुढे म्हणाले, “जर संपूर्ण राजकीय पक्षच असा चोरीला जाऊ शकतो, तर मग कोट्यवधी भारतीयांच्या मतांची चोरी होणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच उरलेले नाही. मतचोरी, सरकारची चोरी आणि आता थेट पक्षाचीच चोरी; हे सर्व प्रकार आपल्या देशातील लोकशाहीच्या पतनाचे जिवंत प्रतीक बनले आहेत.”
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर ताशेरे ओढताना राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगाची खरी घटनात्मक जबाबदारी जनतेच्या कौलाचे रक्षण करणे ही आहे. मात्र, आयोग अशा शक्तींना मदत करत आहे ज्या जनतेचा कौल आणि निर्णयच फिरवून टाकत आहेत. ही लढाई केवळ ममता बॅनर्जींची राहिलेली नाही, तर ज्याला कोणाला देशात स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका हव्या आहेत, त्या प्रत्येक राजकीय पक्षाची आणि मतदाराची ही अस्तित्वाची लढाई आहे.”





