ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेशम-२ सोसायटीतील आगीत नाना काटेंची तत्परता; दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका

पिंपळे सौदागर | विशेष प्रतिनिधी

पिंपळे सौदागर परिसरातील गणेशम-२ सोसायटीमधील आय-३०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये फ्रिजचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी कोणताही विलंब न करता तातडीने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर नाना काटे स्वतः घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.

प्राथमिक माहितीनुसार, अनंतवार कुटुंबीयांच्या फ्लॅटमध्ये फ्रिजचा स्फोट झाल्यानंतर अचानक आग भडकली. आगीची तीव्रता लक्षात घेता सोसायटीतील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः फ्लॅटमध्ये दोन मुली अडकून पडल्याची माहिती समोर आल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली.

नाना काटे यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच सोसायटीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा

गणेशम फेज-२ सोसायटीत आग; दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका

दरम्यान, एका युवकाने तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत फ्लॅटमध्ये अडकलेल्या दोन्ही मुलींना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीतून बाहेर काढल्यानंतर दोन्ही मुलींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या जीवन ज्योती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधणे, घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना देणे, यामुळे नाना काटे यांनी प्रसंगावधान दाखवले. तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित युवकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे दोन मुलींची सुखरूप सुटका होऊ शकली.

या घटनेनंतर सोसायटी परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही चर्चा सुरू झाली असून, घरगुती विद्युत उपकरणे, फ्रिज आणि इतर उपकरणांची नियमित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button