ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेशम फेज-२ सोसायटीत आग; दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे बचावकार्य

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी

शहरातील गणेशम फेज-२ सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची थरारक घटना शुक्रवारी घडली. आगीचे वृत्त समजताच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान, आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका खोलीत दोन लहान चिमुरडी अडकून पडल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य सुरू करून दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीच्या ठिकाणी दोन लहान मुले अडकल्याचे समजताच जवानांनी कोणतीही भीती न बाळगता तातडीने बचावकार्य हाती घेतले आणि दोन्ही चिमुरड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार

या घटनेवेळी नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे देखील घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यांनीही परिस्थितीची पाहणी करून संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत बचावकार्याची माहिती घेतली.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित यंत्रणेकडून त्याबाबतची माहिती घेतली जात आहे.

नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दाखवलेली तत्परता आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेले धाडस व वेगवान बचावकार्य यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेषतः आगीच्या ठिकाणी अडकलेल्या दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button