Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“सगळे नाही, मी एकटाच मुंबईला येतोय”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर मात करत, “सगळे नाही, तर मी एकटाच मुंबईला येतोय, आता सरकार कशी परवानगी देत नाहीत तेच बघतो,” अशी मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले, आता मला खिंड लढू द्या. आता मी एकटा लढतो. जेव्हा रस्त्यावरील काटे संपतील तेव्हा मी तुम्हाला (मराठा समाजाला) सांगतो केव्हा मुंबईला यायचं. आता यामागचं कारण सांगतो. पहिला मुद्दा म्हणजे उद्या (१५ सप्टेंबर) मी एकटाच मुंबईला जाणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊ नका. पण तुम्ही ज्या गाड्या लावल्या आहेत, वर्गणी करून तुम्ही जे वाहनं लावलेले आहेत, ते सध्या जशाच्या तसंच ठेवा, त्या वर्गणीमधील पैसे देखील खर्च करू नका.

हेही वाचा

मोहसीन नक्वींना भारतीय संघाने का नाकारली ट्रॉफी? बीसीसीआयने सांगितले कारण

तुम्ही आणि मी आपल्या दोघांना आता एकमेकांचं ऐकावं लागणार आहे, तेव्हाच या आंदोलनाचा रथ पुढे चालणार आहे. आता डावपेचानेच हा रथ पुढे जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सण-उत्सवांच्या आडून डाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण देखील तशास तसाच डाव टाकणार आहोत. सगळे मराठे मुंबईला गेले तरी आरक्षणच मागायचं आहे आणि मी एकटा गेलो तरी आरक्षणच मागायचं आहे. त्यामुळे सर्व मराठ्यांना योग्यवेळी मुंबईला बोलावलं जाईल, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button