Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

“गाझामध्ये राज्य पुरस्कृत दहशतवाद, पण…”; भारताच्या भूमीवर येऊन मलेशियाच्या पंतप्रधानांकडून पाकिस्तानचा बचाव

नवी दिल्ली | ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत दौऱ्यावर आलेले मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना उघडपणे दुटप्पी भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईला ‘राज्य पुरस्कृत दहशतवाद’ (State Terrorism) संबोधले; मात्र, भारताच्या संदर्भात पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला हाच निकष लावण्यास आणि पाकिस्तानला दहशतवादाचा प्रायोजक म्हणण्यास त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

मुलाखतीदरम्यान अन्वर इब्राहिम यांनी हमासविरोधातील इस्रायलच्या मोहिमेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “हमास ही संघटना अवघी २० वर्षे जुनी आहे, परंतु पॅलेस्टाईनचे वसाहतीकरण गेल्या ७० वर्षांपासून सुरू आहे. मलेशिया आणि भारत या दोन्ही देशांनी वसाहतीकरणाच्या वेदना अनुभवल्या आहेत. त्यामुळे इस्रायलकडून सुरू असलेले पॅलेस्टाईनचे वसाहतीकरण आम्ही सहन करू शकत नाही. सतत होणारे बॉम्बस्फोट आणि लोकांच्या हत्या क्रूर असून इस्रायलची ही कृती म्हणजे राज्य पुरस्कृत दहशतवादच आहे,” असे ते म्हणाले.

हेही वाचा

रत्नागिरीच्या राजापूरमध्ये भीषण अपघात, 8 ते 10 जण गंभीर जखमी

पाकिस्तानच्या दहशतवादावर मौन

इस्रायलवर थेट टीका करणाऱ्या इब्राहिम यांना जेव्हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबद्दल आणि गेल्या वर्षी पहलगाममध्ये घडवून आणलेल्या हल्ल्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मात्र त्यांनी सावध पवित्रा घेतला. या कृतीला ‘राज्य पुरस्कृत दहशतवाद’ म्हणण्यास त्यांनी नकार दिला. “मी इतक्या टोकापर्यंत जाणार नाही. भारतात हा विषय अत्यंत संवेदनशील आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जवळचा मित्र आहे, तसेच आमचे पाकिस्तानी लोकांशीही चांगले संवाद आहेत,” असे सांगत त्यांनी पाकिस्तानचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या दाव्यांवर शंका

भारतात हजारो निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचीच फूस असल्याचे ठोस पुरावे आणि आकडेवारी समोर ठेवल्यानंतरही त्यांनी काणाडोळा केला. “आमच्या गुप्तचर यंत्रणांनी या कारवाया थेट पाकिस्तान सरकारच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे अद्याप निश्चित केलेले नाही,” असा अजब युक्तिवाद त्यांनी केला; मात्र त्याच वेळी “दहशतवादी कृत्य घडलंच नाही, असं माझं म्हणणं नाही,” अशी पुष्टी जोडून त्यांनी वेळ मारून नेली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button