Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कोकणवासीयांचा गणेशोत्सव प्रवास सुखकर; ‘मोदी एक्सप्रेस’ला दादरहून हिरवा झेंडा

गणेशभक्तांना घेऊन पहिली विशेष रेल्वे कोकणाच्या दिशेने रवाना; ‘मोदी एक्सप्रेस’ उपक्रमाचे १४वे वर्ष

मुंबई : कोकणवासीयांना कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून कोकण प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १४ येथून पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणाच्या दिशेने रवाना झाली.

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून या विशेष रेल्वेला मार्गस्थ केले. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना सुखकर प्रवास आणि आनंदी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा –  दिव्यांगांना यूडीआयडी प्रमाणपत्रासाठी विशेष अभियान राबवा; सचिन अहिर यांचे निर्देश

यंदा या उपक्रमाचे १४वे वर्ष आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची आस मनात घेऊन मोठ्या उत्साहात कोकणाकडे रवाना झालेल्या गणेशभक्तांसाठी या उपक्रमामुळे प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी होण्यास मदत होणार आहे.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने मुंबई आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने दरवर्षी ‘मोदी एक्सप्रेस’ची व्यवस्था केली जाते. विशेष रेल्वेला निरोप देताना प्रवाशांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button