आदर्श शिक्षक पुरस्काराने ९ शिक्षकांचा सन्मान; ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी-चिंचवड | अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि लायन्स क्लब ऑफ इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राधिकरण, निगडी येथे आदर्श शिक्षक पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. भूषण ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
दीपप्रज्वलन आणि गणेशस्तोत्र पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांनी प्रास्ताविकातून पिंपरी-चिंचवड शहरातील कार्याचा आढावा घेतला. प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी यांनी महासंघाच्या देशव्यापी कार्याची माहिती दिली, तर लायन्स क्लबचे सलीम शिकलगार यांनी त्यांच्या सामाजिक उपक्रमांचा परिचय करून दिला. या सोहळ्यात १० गरजू विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती देण्यात आली, तसेच ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मागील वर्षी आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या सुनिता डोईफोडे, सुषमा वैद्य आणि अनिता कुलकर्णी यांना अनुक्रमे पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात यंदा प्रथमच आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी:
सौ. वृंदाताई गोसावी
श्री. मकरंद गुर्जर
सौ. स्नेहा शेखर पाठक
सौ. जान्हवी जोशी
हेही वाचा
गणेशोत्सवापूर्वी पुण्यात FDAची धडक कारवाई; ३८ लाखांचा खवा-पनीर जप्त
सौ. दिपाली पाटील
श्री. जीवन देशमुख
सौ. दर्शना पोलकम
श्री. नितीन साळी
सौ. स्नेहल कुलकर्णी
पुरस्कारार्थींच्या वतीने मकरंद गुर्जर, नितीन साळी आणि स्नेहा पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात निखिल लातूरकर यांनी शिक्षकांनी समाजातील किमान दोन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. प्रमुख वक्ते प्रा. भूषण ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू देण्याचा सल्ला पालकांना दिला आणि प्रगत शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, ब्रह्मोद्योग प्रदेश उपाध्यक्ष राजन बुडुख, प्रमुख प्रवक्ते डॉ. संजय सुपेकर, लायन्स क्लब ऑफ इनोव्हेशनचे अध्यक्ष संदेश मुखेडकर, झोन चेअरमन प्रवीण शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन गुडसूडकर यांनी केले, आभार सरचिटणीस आनंद देशमुख यांनी मानले, तर सुषमा वैद्य यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.




