TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यास कॉलेजवर कडक कारवाई; CET सेलचा इशारा

मंजूर शुल्काव्यतिरिक्त रोखीने किंवा इतर कारणांनी पैसे घेणे बेकायदेशीर; नियमबाह्य प्रवेशही रद्द होणार

मुंबई : राज्यातील काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून मंजूर शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त फी किंवा इतर शुल्काच्या नावाखाली पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. यानंतर महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे (CET Cell) विद्यार्थी, पालक तसेच काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या आहेत.

या तक्रारींची दखल घेत मंजूर नसलेले किंवा नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या संस्थांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शुल्क नियामक प्राधिकरणाने दिला आहे.

मंजूर शुल्काव्यतिरिक्त रक्कम घेणे बेकायदेशीर

CET सेलला प्राप्त झालेल्या निवेदनांमध्ये काही अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून अवाजवी आणि नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही पालकांनी महाविद्यालयांकडून रोख स्वरूपात किंवा अन्य कारणे सांगून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून संपूर्ण संस्थेसाठी शुल्क मंजूर केले जाते. त्यामुळे मंजूर शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क किंवा रोखीने मागणी केलेली रक्कम घेणे बेकायदेशीर आणि पूर्णपणे प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा –  मनोज जरांगे पाटलांना शिवसेना मंत्र्यांचा इशारा; ‘राजकारण करायचं असेल तर जशास तसं उत्तर देऊ’

फक्त मंजूर शुल्कच आकारावे

सर्व शैक्षणिक संस्थांनी शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेलेच अचूक शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारणे बंधनकारक आहे. तसेच संस्थेला मिळालेला अधिकृत शुल्क मंजुरी आदेश त्यांच्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रकाशित करणे आवश्यक आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती तपासावी आणि मंजूर शुल्कापेक्षा अधिक रक्कम मागितल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमबाह्य प्रवेशही रद्द होणार

कोणतीही संस्था मंजूर नसलेले किंवा नियमबाह्य शुल्क आकारताना आढळल्यास संबंधित संस्थेविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच अशा संस्थांमधील नियमबाह्य प्रवेश रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा CET सेलने दिला आहे.

त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास संबंधित संस्थेला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत नियमबाह्य शुल्क आकारणीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button