Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी; चीन मास्टर्सचं जेतेपद पटकावलं!

China Masters | भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चीन मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. एका गेमने पिछाडीवर पडल्यानंतरही अप्रतिम पुनरागमन करत भारतीय जोडीने १ तास १० मिनिटे रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या आणि थरारक अंतिम सामन्यात यजमान चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यु जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. या शानदार विजयासह सात्विक-चिरागने चीन मास्टर्सचे प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावून नव्या वर्षातील दुसरे मोठे जेतेपद खिशात घातले.

सामन्याच्या सुरुवातीला चिनी जोडीने कमालीचा वेगवान आणि आक्रमक खेळ करत ५-० अशी आघाडी घेतली. भारतीय जोडीला सुरुवातीला रॅलिजवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि चिरागकडून सर्व्हिसमध्ये झालेल्या चुकांमुळे पहिला गेम ११-२१ अशा मोठ्या फरकाने गमवावा लागला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये सात्विक-चिरागने बचावात सुधारणा करत रणनीती बदलली. सात्विकने वापरलेल्या फ्लिक सर्व्हिस आणि ४५ शॉट्सच्या एका मॅरेथॉन रॅलीतील विजयाच्या जोरावर भारताने हा गेम २१-१३ असा सहज जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

हेही वाचा

“गोरक्षेचा मुद्दा भारतात प्रत्येक धर्माने स्वीकारला आहे”; ब्रिटनमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

निर्णायक गेममधील अटीतटीचा थरार

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये चिनी जोडीने पुन्हा ४-० अशी आघाडी घेत दडपण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, सात्विक आणि चिरागने संयमी खेळ करत पिछाडी भरून काढली आणि स्कोअर ७-७ असा बरोबरीत आणला. एका क्षणाला चीनची जोडी १५-१३ ने पुढे असताना भारताने १६-१६ अशी बरोबरी साधली. अखेरच्या क्षणी वेगाच्या नादात चिनी खेळाडूंचे फटके नेटमध्ये अडकले आणि भारताने २१-१७ असा निर्णायक गेम जिंकत ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २०२३ आणि २०२५ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर भारतीय जोडीने अखेर या स्पर्धेचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला.

या ऐतिहासिक यशानंतर बोलताना सात्विकसाईराज म्हणाला, “आम्ही दुखापतीतून सावरून कोर्टवर परतलो आहोत, त्यामुळे या विजेतेपदाने आमचा आत्मविश्वास द्विगुणित केला आहे. आम्ही आखलेली रणनीती तंतोतंत कामी आली.” तर चिराग शेट्टीने सांगितले, “आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी उतरण्यापूर्वी हे जेतेपद मिळणे म्हणजे आमच्या मेहनतीला मिळालेली पावती आहे. आता थोडी विश्रांती घेऊन पूर्ण ताकदीने सरावाला लागू.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group